सागर घरत
Karmala News : करमाळा : ‘ गावाला रस्ता मिळावा म्हणून गाव विकायला काढले’ या बातमीने सर्व महाराष्ट्रामध्ये धुमाकुळ घातला होता. या वृत्ताची तातडीने दखल घेत गावाला रस्ता मंजूर झाला. याच करमाळा तालुक्यातील घरतवाडी गाव हे ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. घरतवाडी-कुंभारगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
घरतवाडी या गावात दळणवळणाची परिस्थिती चांगली नाही. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि येथे रस्ता मंजूर झाला. परंतु पहिल्याच घासाला खडा लागला. रस्ते मंजूर कामाप्रमाणे न करता मनमानी कारभार करून निकृष्ठ दर्जाचे रस्त्याचे काम सुरू आहे. डांबरी रस्त्याच्या दगडांमध्ये दगड कमी आणि मातीच जास्त आहे.
रस्त्यासाठी वापरण्यात आलेल्या दगडांची उंची ही कामाच्या नियमाप्रमाणे न ठेवता, मोठी खडी वापरली आहे. जास्तीचे दगड मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या शेजारी लोटून देण्यात आले आहेत. याबाबत ठेकेदारांना वारंवार सूचना देवूनही निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. यामुळे ठेकेदाराचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे. रस्ते व बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कामामध्ये सुधारणा न झाल्यास तत्काळ काम बंद करण्याच्या सूचना ग्रामस्थांकडून ठेकेदारास देण्यात आल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
karmala News : घरतवाडी-कुंभारगाव रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
Karmala News : मांगी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; २० दिवसांत १५ जनावरांचा फडशा
Karmala News : वंजारवाडीत वृद्धाचा निघृण खून; डोक्यात जबर मारहाण; संशयिताचा तपास सुरु