अजित जगताप
सातारा : संगीत हे माणसाच्या सुखदुःखाशी समरस होऊन मानवी भावना व्यक्त करण्यारे उत्तम असे शस्त्र आहे. त्यामुळे धावपळीच्या जीवनात आपल्याला संगीतच विरंगळा देऊ शकतो. याची प्रचिती अनेकांना आली आहे. खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये संगीत प्रेमींसाठी कराओके गायन प्रशिक्षण चर्चासत्र संपन्न झाले. अशी माहिती डॉ चंद्रशेखर नांगरे यांनी दिली आहे.
संगीत क्षेत्राशी आवड असणारे वडूज नगरीतील किशोर कुमार फॅन क्लबचे संस्थापक दिवंगत शंकर चव्हाण यांना सर्व सदस्य यांनी विनम्र अभिवादन करून या चर्चासत्राला सुरुवात झाली. अपेक्षित कार्यक्रमानुसार अनेकांनी विविध गायकांची गीते सादर केली. काहींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व शनिवार व चौथ्या शनिवारी चर्चासत्रानुसार वडूज नगरीचे संगीत प्रेमी एकत्र येऊन संगीत सेवा करण्यात येईल. असा निर्धार व्यक्त करण्यात आला. या गायन प्रशिक्षण चर्चासत्रात अनेक जण सहभागी झाले होते.
समाजामध्ये सामाजिक बांधिलकी स्वीकारून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉ. चंद्रशेखर नांगरे, रियाज मुल्ला, उमेश घाडगे, डॉ.धनंजय कुलकर्णी,कुलकर्णी मॅडम, डॉ. अजित इनामदार यांच्यासह अनेक जुन्या- नवोदित कलावंतांनी आपली कला सादर केली.
प्रारंभी अनेक मान्यवरांनी विविध गीत सादर करून सर्वांचेच मनोरंजन केले.तसेच सकारात्मक प्रतिसाद देऊन चर्चा केली. ऍड. अनिल गोडसे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. वैभव भंडारे यांनी आभार मानले.