नाशिक : येथील चवदार तळ्यावर मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश न करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले. तेव्हा त्यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडला गेल्याचा आरोप आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी आव्हाडांवर सडकून टीका केली आहे.
यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी आव्हाडावर टीका करत म्हणाले, स्टंटबाजीच्या नादात डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले आहेत. याबाबत त्यांनी माफी मागितली पाहिजे.
एकप्रकारे हा देशद्रोह झाला आहे. स्टंटबाजीत आपण काय केलो हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये, आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत. आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी, अन्यथा आव्हाडांविरोधात महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मिटकरी यांनी केला.