मुंबई : जेट एअरवेज कंपनीने कर्मचाऱ्यांची ३५० कोटींची ग्रॅच्युइटी थकवली आहे. चार विमाने सील जेटच्या ४ एअरक्राफ्टला सील करण्याचे आदेश मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले. त्यानंतर तहसीलदारांनी कंपनीची चारही विमाने सील केली आहेत.
जेट एअरवेजने ग्रॅच्युइटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना कंपनीने दिली नाही. त्यामुळे कंपनीचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीसाठी कायदेशीर लढा देत आहेत. कर्मचाऱ्यांनी कंपनीविरोधात ट्रिब्युनलमध्ये धाव घेतली होती.
ट्रिब्युनलने गेल्या ऑक्टोबरमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतरही कर्मचाऱ्यांना पैसे मिळाले नसल्याने प्रशासनाने वरील निर्णय घेतला आहे. तसेच जोपर्यंत कामगारांची ग्रॅच्युइटी मिळत नाही. तोपर्यंत कंपनीला एअरक्राफ्ट विकता येणार नाही. असेही सांगितले आहे.
दरम्यान, जेट एअरवेजमधील २२ हजार कामगारांची ग्रॅच्युइटी थकली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी कायदेशीर लढा यशस्वी लढूनही कर्मचाऱ्यांना रक्कम मिळाली नाही. यासंदर्भात त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला.अखेरी त्यात त्यांना यश आले.
कंपनी जोपर्यंत कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी देत नाही, तोपर्यंत हे सील काढण्यात येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.