पुणे : राज्यातील अनेक भागांमध्ये स्वाइन फ्लूची प्रकरणे वाढत आहेत. या प्रकरणी मुंबईत सर्वाधिक रुग्णांची आढळले. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात एकूण 26 मृत्यूंची नोंद झाली आहे.
गेल्या दहा महिन्यांपासून राज्यात स्वाईन फ्लूचा प्रार्दुभाव वाढत आहे. यात 56 जणांचा मृत्यू तर 2278 जणांना लागण झाली आहे. स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण हे 756 रुग्ण मुंबईत आहेत. पुण्यात 360, ठाण्यात 274, कोल्हापूर 249 रुग्ण असून एकही मृत्यू झालेला नाही. नाशिकमध्ये 19, नागपूरमध्ये 26 असा सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या दहा महिन्यात स्वाईन फ्लूच्या 56 मृत्यूंची नोंद झाली आहे.
स्वाइन फ्लू कसा होतो?
स्वाइन फ्लू म्हणजेच H1N1 व्हायरस. हा एक संसर्गजन्य रोग आहे. स्वाईन फ्लूची सर्वप्रथम लागण डुकरांना झाल्याचं आढळले होते. त्यानंतर हा आजाराचा प्रसार प्राण्यांपासून माणसापर्यंत पोहोचला. खोकणे, शिंकणे आणि उघड्यावर थुंकणे याद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये या रोगाचा प्रसार होतो. दूषित पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर हा विषाणू बोटांनी डोळ्याच्या,नाकाच्या आणि तोंडाच्या संपर्कात येतो त्यानंतर शरीरामध्ये पसरतो. स्वाइन फ्लूच्या विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर 1 ते 7 दिवसांच्या कालावधित रुग्ण स्वाईन फ्लू संक्रमित होतो. 2009 साली जागतिक आरोग्य संघटनेने स्वाइन फ्लू रोगास महामारी म्हणून घोषित केले होते.
स्वाइन फ्लूची लक्षणे:
-ताप
-खोकला
-घसा खवखवणे
-श्वास घेण्यास त्रास
-स्नायू दुखणे
-डोकेदुखी
-थकवा