पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी स्थापन झालेल्या चौकशी आयोगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, सुवेझ हक आणि डॉ. शिवाजी पवार यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यानुसार, त्यांची २१ ते २५ जानेवारीदरम्यान चौकशी होणार आहे. चौकशी करून त्यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हर्षाली पोतदारची २१ ते२२ जानेवारी, डॉ शिवाजी पवार यांची २१ ते२३ जानेवारी, विश्वास नांगरे पाटील २४ ते २५ जानेवारी आणि सुवेझ हक यांची २४ ते २५ जानेवारी दरम्यान चौकसी होणार आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. २१ ते २५ जानेवारी दरम्यान तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.
१ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ शौर्य दिन साजरा जमलेल्या लोकांवर दगडफेक करण्यात आली होती. या घडलेल्या हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यू झाला होता.यानंतर मोठा हिंसाचार झाला होता. वाहनांची जाळपोळ, मालमत्तेचे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर जमावाला भडकावल्याचा आरोप करण्यात आला होता.