कोल्हापुर : Dream 11 या ऑनलाइन खेळात मुरगुड (जि. कोल्हापूर) तालुक्यातील सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला १ कोटीची लॉटरी लागली आहे. लॉटरी लागल्याची माहिती समजताच गावकऱ्यांनी मुलाची जंगी मिरवणूक काढून सत्कार केला आहे.
सक्षम बाजीराव कुंभार असे लॉटरी लागलेल्या मुलाचे नाव आहे. तर सक्षमचे वडील बाजीराव कुंभार हे महावितरणमध्ये कर्मचारी आहेत.
सक्षम याने भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्यात या मुलाने ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन खेळात भाग घेतला होता. या स्पर्धेत त्याला तब्बल एक कोटींचा जॅकपॉट लागला आहे.
सक्षमने एक कोटी जिंकल्याचे समोर येताच गावकऱ्यांनी बाईक रॅली काढत त्याची जंगी मिरवणूक काढली आहे. तर त्याच्या खात्यात ७० लाख रुपये जमा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. कराची रक्कम वजा करुन ही पैसे खात्यात जमा झाल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरु असल्याने सक्षमकडे मोबाईल आला होता. त्याने ड्रीम इलेव्हनवर अकाउंट सुरू केले आणि त्यावर टीम बनवून खेळण्यास सुरु केले.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी त्याने तयार केलेल्या टीमने सर्वात जास्त गुण मिळवले आणि त्याला एक कोटी रुपयांचे बक्षिस लागले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी त्याचावर कौतुकाचा वर्षाव केला.