NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी बंड केल्याने मोठी फुट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाचं हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलं असून याप्रकरणी आज सुनावणी पार पडणार आहे. आजही निवडणूक आयोगात शरद पवार गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे. आज सायंकाळी 4 वाजल्यापासून युक्तिवादाला सुरूवात होणार आहे. शरद पवार गटाचे वकिल देवदत्त कामत आज युक्तिवाद करणार आहेत .(Ajit Pawar)
मागच्या सुनावणी दरम्यान, शरद पवार यांची सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड ही चुकीची असल्याचा दावा अजित पवार गटाच्या युक्तिवादादरम्यान केला होता. त्याला शरद पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देत ती निवड बेकायदेशीर होती तर मग तेंव्हाच तुम्ही दाद का मागितली नाही असा प्रश्न उपस्थित केला होता.(Sharad Pawar)
त्यासोबतच अजित पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा करणं म्हणजे विश्वासघातकी प्रकार असल्याचा युक्तिवाद शरद पवार गटाकडून केला होता. प्रसार माध्यमांमध्ये सुनावणी लवकर संपवून निकाल लागेल असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं होत. या दाव्यावरही कामत यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आयोगाने नाराजी व्यक्त करत दोन्ही गटांना माध्यमांशी बोलताना काळजी घ्याण्याचं आवाहन देखील केलं होत.(NCP)
स्वता: शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाचं हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलं असून याप्रकरणी आज सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीसाठी शरद पवार गटाकडून स्वता: शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, खा. वंदना चव्हाण, आ. जितेंद्र आव्हाड, आ. सुनिल भुसारा उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. तर, अजित पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, समिर भुजबळ, सुरज चव्हाण उपस्थित राहण्याची शक्यता आहे.