पुणे : वार्षिक रोखीचे लक्ष्य गाठण्यात कंपनी अपयशी ठरल्याने IBM कंपनीने तब्बल ३ हजार ९०० कर्मचाऱ्यांना बुधवारी (ता.२५) कामावरून काढून टाकले आहे. ही माहिती कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी जेम्स कॅव्हानो यांनी दिली आहे.
आर्थिक मंदीचा मोठा फटका कंपन्यांना बसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार खर्च कपात करत आहेत. विविध देशातील अनेक दिग्गज कंपन्यांच्या नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन कंपन्या जागतिक आर्थिक मंदीला सोमोरे जात आहेत. त्यामुळं कंपन्या खर्चात कपात करत आहेत.
देशातील सर्वच कंपन्यांना आर्थिक मंदिचा फटका बसत आहे. सातत्याने कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत आहेत. नुकतेच मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅमेझॉन, स्विगी शेअर चॅट या कंपन्यानी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले होते. त्यानंतर आता IBM ने देखील आता ३ हजार ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे.