पुणे प्राईम न्यूज डेस्क: काही दिवसांपूर्वी आएएस अधिकारी संजीव हंस चर्चेत आले होते. आएएस अधिकारी संजीव हंस हे त्यांनी केलेल्या भरपूर कमाईमुळे चर्चेत आले होते. त्यांनी इतकी कमाई केली की ईडीलासुद्धा कामाला लागावे लागले होते. त्यानंतर त्यांना अटक झाली आहे. आणि केंद्र सरकाराने त्यांना सेवेतून निलंबित केले आहे.
आयएएस अधिकारी संजीव हंस हे बिहार कॅडरचे अधिकारी आहेत. पंजाबमध्ये 19 ऑक्टोंबर 1973 रोजी त्यांचा जन्म झाला. घरात शैक्षणिक वातावरण असल्यामुळे त्यांनी बारावीनंतर अभियांत्रिकीची पदवी घेतली. सिव्हील इंजीनियरिंगमधून बीटेक केले. त्यानंतर यूपीएससीची तयारी सुरु केली. 1997 मध्ये ते आयएएस झाले. मसुरी प्रशासनिक प्रशिक्षणानंतर त्यांना बिहार केडर मिळाले होते. बिहारमध्ये त्यांनी अनेक पदांवर काम केले आहे.
कंपनीकडून लाच घेतल्याचे आरोप
आयएएस बनल्यानंतर त्यांची पहिली पोस्टींग बिहारमधील बांका जिल्ह्यात झाली. पुढेअनेक जिल्ह्याचे ते जिल्हाधिकारी राहिले. आयएएस संजीव हंस ऊर्जा विभागात मुख्य सचिव आणि बिहार स्टेट पॉवर होल्डिंग कंपनीचे एमडी देखील राहिले आहेत. त्यावेळी त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते. त्यात प्रीपेड मीटर लावण्यासाठी कंपनीत लाच घेतली आणि हेराफेरी केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.