पुणे : राज्यात पावसाने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. पावसाळा आला की पर्यटकांना बाहेर फिरण्याचे वेड लागते. पर्यटनासाठी पर्यटक पाण्याच्या ठिकाणी गर्दी करतात. परंतु वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात वाहून जाण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. नुकतेच भुशी डॅममध्ये अन्सारी कुटुंबातील पाचजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. अशा घटनामुळे अनेकजणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
जर असा प्रसंग कोणावरही ओढवला तर अशावेळी नेमकी कोणती काळजी घ्यावी, यासंबंधीचा एक व्हिडिओ पुणे आयएमडीचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये होसाळीकर यांनी पाण्यापासून बचाव कसा करायचा याबद्दल सांगितलं आहे.
जर वाहत्या पाण्यात समूहाणे अडकलो तर स्वतःचा आणि इतरांचा जीव कसा वाचवू शकतो हे china मध्ये दिलेले training प्रशिक्षण व्हिडिओ पहा आणि फॉरवर्ड करा जेणेकरून कुणाला तरी उपयोगी येईल
Courtesy social media pic.twitter.com/uJHOyfeR9i— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 4, 2024
जर तुम्ही पाण्याच्या ठिकाणी कुठे फिरायला गेलात. त्यावेळेस अचानक पाण्याचा प्रवाह जास्त वाढला तर त्या पाण्यात अडकलेल्या लोकांनी पाण्यात आडवं उभं राहण्यापेक्षा एकापाठी एक उभं राहावे. एकमेकांना घट्ट पकडून अशा पद्धतीने उभं राहिल्यास पाण्याच्या प्रवाहाला विरोध होत नाही. चीनमध्ये देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा हा भाग असल्याचं होसाळीकर यांनी सांगितलं.
पुणे आयएमडीचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करत म्हणाले,
जर वाहत्या पाण्यात समूहाणे अडकलो तर स्वतःचा आणि इतरांचा जीव कसा वाचवू शकतो हे china मध्ये दिलेले training प्रशिक्षण व्हिडिओ पहा आणि फॉरवर्ड करा जेणेकरून कुणाला तरी उपयोगी येईल