Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“गर्भपात कर, नाहीतर तुझ्या पोटावर…” पैशांसाठी सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा छळ; पतीला लॉजवर रंगेहाथ पकडलं

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 5 June 2025, 19:10

कोल्हापूर: प्रेमविवाह करून संसाराची सुरुवात केल्यानंतर अवघ्या वर्षभरातच 10 लाखांच्या हुंड्यासाठी सात महिन्याच्या गर्भवती पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी येथील रोहीत अर्जुन दुधाणे याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला ही नर्सिंगचे शिक्षण घेत असताना तिची ओळख रोहीतशी झाली होती. ओळखीतून प्रेम वाढले आणि मे 2024 मध्ये दोघांचा विवाह कोल्हापुरातील शुक्रवार पेठेत पार पडला. मात्र, लग्नाच्या केवळ चार महिन्यांनंतर, म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये पीडिता गर्भवती राहिल्यावर, तिच्या छळाला सुरुवात झाली. सकाळी लवकर उठत नाहीस, घरकाम करत नाहीस, अशा किरकोळ कारणांवरून पती रोहीत पीडितेवर अविरत मानसिक ताण आणि शारीरिक त्रास देत होता.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, ऑक्टोबर 2024 ते 2 जून 2025 या कालावधीत, रोहीत तिला सतत म्हणत होता, “तुझ्या आई-वडिलांनी लग्नात काही दिलं नाही, त्यामुळे मला 10 लाख रुपये द्या नाहीतर मला सोडून जा”. एवढ्यावरच न थांबता, तो तिला म्हणायचा की “बाळ नको आहे, गर्भपात करून घे आणि घटस्फोट घे”. या सततच्या छळामुळे मानसिकरीत्या खचलेल्या पीडितेला 25 एप्रिल 2025 रोजी माहेरी आणून सोडण्यात आले. त्यानंतर तिने पतीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु रोहीतने तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केला होता.

17 मे रोजी पीडिताच्या मामांनी मध्यस्थी करून तिला सासरी पाठवलं, पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा वाद झाला. सकाळी लवकर उठण्यावरून झालेल्या वादात रोहीतने तिला सांगितले, “तू आधी गर्भपात कर, मग बोल”, आणि “माझ्याकडे राहू नको, निघून जा”. रात्री घरी उशिरा आल्यावर पीडितेने विचारणा केली असता रोहीतने तिला “पोटावर मारून ठार मारण्याची धमकी दिली”. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीही तो उशिरा घरी आला आणि कुणा महिलेशी फोनवर बोलतोय असा संशय आल्यावर पीडितेने संवाद ऐकण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी रोहीतने तिला मारहाण व शिवीगाळ करून घराबाहेर काढले, असं तिच्या तक्रारीत नमूद आहे.

 

या प्रकरणाचा आणखी एक धक्कादायक पैलू म्हणजे, तीन दिवसांपूर्वी हणबरवाडी (ता. करवीर) येथील एका लॉजवर रोहित दुसऱ्या एका महिलेसोबत रंगेहाथ पकडला गेला. पीडितेचे नातेवाईक त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असताना त्याने रस्त्यावरच धमक्या दिल्या, शिवीगाळ केली आणि मारहाण केली. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या महिलेनेही रोहीतला साथ दिली आणि पीडितेच्या एका नातेवाइकाच्या डोक्यात लाकडी बॅटनने घाव घालून जखमी केलं. या प्रकरणी इस्पुर्ली पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. पीडितेने आपल्या आणि आपल्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी कायदेशीर मार्ग निवडत न्यायालयीन लढा सुरु केला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल, 3 काडतुसे! बारामतीत तरुणाला अटक; 2.26 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday, 23 October 2026, 10:41

पत्नीच्या मृत्यूचा बनाव की प्रेमाचं जाळं? सुमितच्या सत्याने मानसीला हादरवलं; डोंबिवलीतील लॉजमध्ये तरुणीची भयंकर अवस्था..

Friday, 23 October 2026, 10:37

500 कोटींच्या आरोपांची तक्रार द्या; बावनकुळेंचे जरांगेंना आवाहन, पुरावे सादर केल्यास निष्पक्ष चौकशीचे आश्वासन

Friday, 23 October 2026, 10:35

लग्न होणार अडीच लाख द्यावे लागतील अन् दोन दिवसांतच धक्कादायक खुलासा; लग्नाच्या नावाखाली फसवणूक

Friday, 23 October 2026, 10:25

पुण्यात डेंगीचा पहिला बळी! 8 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; 4-5 दिवस ताप अन् पोटदुखीनंतर अचानक श्वास..

Friday, 23 October 2026, 10:19

संसारात कटुता, छळाचे आरोप अन् दुःखद घटना! पुण्यात दोन विवाहित महिलांनी केली आत्महत्या

Friday, 23 October 2026, 10:13
Next Post

Bengaluru Stampede Case: 'आरसीबी' संघ, 'डीएनए' इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि 'केएससीए' प्रशासकीय समितीवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp