Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संसारात कटुता, छळाचे आरोप अन् दुःखद घटना! पुण्यात दोन विवाहित महिलांनी केली आत्महत्या

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 23 October 2026, 10:13

पुणे : पुण्यात कौटुंबिक वाद आणि छळाच्या आरोपांशी संबंधित दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. हांडेवाडी येथे घटस्फोटाच्या मागणीवरून होत असलेल्या कथित छळामुळे 41 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत वडगाव शेरी येथे माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप असून, 23 वर्षीय विवाहितेने जीवन संपवले. या दोन्ही प्रकरणांत संबंधित महिलांच्या पतींना पोलिसांनी अटक केली आहे.

हांडेवाडी येथे 20 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. सौमिता गौतम सावू (वय 41) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा विवाह गौतम विभूतीभूषण सावू (वय 45) यांच्याशी झाला होता. दोघांना 14 वर्षांचा मुलगा आहे. सौमिता एका शाळेत नोकरी करत होत्या, तर त्यांचे पती एका कंपनीत कार्यरत आहेत.

पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पतीकडून वारंवार घटस्फोटाची मागणी केली जात होती. या कारणावरून होत असलेल्या कथित मानसिक छळामुळे सौमिता तणावात होत्या. दसऱ्याच्या दिवशी त्यांनी राहत्या इमारतीच्या बाल्कनीतून उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी पतीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

वडगाव शेरीतही विवाहितेचे टोकाचे पाऊल

दुसरी घटना वडगाव शेरी परिसरात घडली. प्रियंका सुरेश कांबळे (वय 23) असे मृत विवाहितेचे नाव आहे. त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे.

 

माहेरहून पैसे आणण्यासाठी पतीकडून दबाव टाकला जात होता आणि मानसिक तसेच शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी पती सुरेश शिवाजीराव कांबळे (वय 26) याला अटक केली आहे. दोन्ही घटनांचा पुढील तपास पोलीस करत आहेत. आरोपांबाबतचा अंतिम निष्कर्ष तपासातून स्पष्ट होणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कदमवाकवस्तीत कोयता फिरवत दहशत माजविणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Saturday, 24 October 2026, 11:56

दसऱ्यासाठी गाव गाठलं, इकडे घर फोडलं! कुंजीरवाडीत चोरट्यांचा डाव अन् 23 हजारांचा ऐवज केला लंपास

Saturday, 24 October 2026, 11:43

Loni Kalbhor News: प्रतिबंधात्मक कारवाईसाठी बोलावले अन् पोलीस ठाण्याबाहेरच गोंधळ; माजी सैनिकाविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 11:36

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पाण्याचं गणित बिघडलं, प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Saturday, 24 October 2026, 11:21

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ‘मुळशी कनेक्शन’, दोन व्हिडिओंनी वाढवलं गूढ

Saturday, 24 October 2026, 11:10

Loni Kalbhor News: कॉलेजच्या गरबा कार्यक्रमानंतर राडा! विद्यार्थ्याला बेल्ट अन् दांडक्याने मारहाण; नेमकं कारण काय? वाचा

Saturday, 24 October 2026, 10:54
Next Post

पुण्यात डेंगीचा पहिला बळी! 8 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; 4-5 दिवस ताप अन् पोटदुखीनंतर अचानक श्वास..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp