Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्तीत कोयता फिरवत दहशत माजविणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 24 October 2026, 11:56

लोणी काळभोर, ता. 24 : हातात लोखंडी कोयता फिरवत येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ आणि धमकावून परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून लोणी काळभोर पोलिसांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील संभाजीनगर परिसरातून दोन तरुणांना 19 ऑक्टोबर रोजी दुपारी ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी कोयता आणि होंडा शाईन दुचाकी असा एकूण 50 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

केशर प्रेम बिशुकर्मा (वय 19, व्यवसाय मजुरी) आणि अभिषेक दत्तराव रूपनर (वय 18, शिक्षण, दोघेही संभाजीनगर, कदमवाकवस्ती) अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार आण्णा दिलीप माने यांनी सरकारच्यावतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी स्टेशन पोलीस चौकीच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. संभाजीनगर परिसरात शाईन दुचाकीवरून फिरणाऱ्या दोघांपैकी मागे बसलेला तरुण हातात कोयता फिरवत नागरिकांना धमकावत असल्याचे, तर दुचाकीवरील दुसरा तरुण ‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादी लागायचे नाही,’ असे ओरडत असल्याचे या माहितीमध्ये सांगण्यात आले होते. त्यामुळे नागरिक घाबरून रस्ता बदलत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.

या माहितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पैठणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाव घेतली. व्यंकटेश हाईट्स सोसायटीजवळ संशयित दोघे दुचाकीवर दिसून आले. त्यावेळी मागे बसलेल्या तरुणाच्या हातात कोयता असल्याचे आणि दोघेही मोठ्याने ओरडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

 

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सुमारे 200 रुपये किमतीचा लोखंडी कोयता आणि अंदाजे 50 हजार रुपये किमतीची होंडा शाईन दुचाकी जप्त केली. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल आण्णा दिलीप माने यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी शस्त्रासह दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कदमवाकवस्तीत कोयता फिरवत दहशत माजविणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Saturday, 24 October 2026, 11:56

दसऱ्यासाठी गाव गाठलं, इकडे घर फोडलं! कुंजीरवाडीत चोरट्यांचा डाव अन् 23 हजारांचा ऐवज केला लंपास

Saturday, 24 October 2026, 11:43

Loni Kalbhor News: प्रतिबंधात्मक कारवाईसाठी बोलावले अन् पोलीस ठाण्याबाहेरच गोंधळ; माजी सैनिकाविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 11:36

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पाण्याचं गणित बिघडलं, प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Saturday, 24 October 2026, 11:21

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ‘मुळशी कनेक्शन’, दोन व्हिडिओंनी वाढवलं गूढ

Saturday, 24 October 2026, 11:10

Loni Kalbhor News: कॉलेजच्या गरबा कार्यक्रमानंतर राडा! विद्यार्थ्याला बेल्ट अन् दांडक्याने मारहाण; नेमकं कारण काय? वाचा

Saturday, 24 October 2026, 10:54
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp