Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

500 कोटींच्या आरोपांची तक्रार द्या; बावनकुळेंचे जरांगेंना आवाहन, पुरावे सादर केल्यास निष्पक्ष चौकशीचे आश्वासन

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 23 October 2026, 10:35

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित कथित 500 कोटी रुपयांच्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लिप प्रसिद्ध करत गंभीर आरोप केले असताना, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे यांना अधिकृत तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात ठोस पुरावे सादर केल्यास सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी ही भूमिका मांडली. जरांगे यांच्याकडे कथित 500 कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात ठोस पुरावे असतील, तर त्यांनी केवळ प्रसारमाध्यमांसमोर आरोप करण्याऐवजी पोलीस किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करावी, असे ते म्हणाले.

जरांगे यांनी गुरुवारी जालना येथे एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली. या क्लिपच्या आधारे त्यांनी आपले आंदोलन दडपण्यासाठी आणि आपल्याला गप्प करण्यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कथित 500 कोटी रुपयांचा व्यवहार करण्याचा कट रचल्याचा आरोप केला. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी अधिकृत तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृह विभाग संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून निष्पक्ष व सखोल चौकशी करतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. तक्रारीतील तथ्यांची पडताळणी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी जाहीर सभेत अशा कोणत्याही आर्थिक व्यवहाराचे आरोप फेटाळले होते. आपण कोणालाही पैसे दिले नाहीत किंवा कोणाकडून पैसे घेतले नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. जरांगे हे आपल्या सुरक्षेबाबत भीती व्यक्त करणारी विधाने करून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला. त्यामुळे आता जरांगे या प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल करतात का आणि त्यानंतर चौकशीला कोणती दिशा मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

लोणीकंद येथे मोकळ्या माळरानावर गांजा ओढताना तिघांना पकडले रंगेहाथ; खंडोबा माळ परिसरात पोलिसांची कारवाई

Friday, 23 October 2026, 11:16

सासऱ्याशी वाद, मध्यरात्री जावयाने दोन दुचाकी पेटवल्या! हडपसर येथील घटना

Friday, 23 October 2026, 11:09

ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढणार? कारवाईच्या हालचालींना वेग; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचे मोठे संकेत…

Friday, 23 October 2026, 11:04

स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल, 3 काडतुसे! बारामतीत तरुणाला अटक; 2.26 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday, 23 October 2026, 10:41

पत्नीच्या मृत्यूचा बनाव की प्रेमाचं जाळं? सुमितच्या सत्याने मानसीला हादरवलं; डोंबिवलीतील लॉजमध्ये तरुणीची भयंकर अवस्था..

Friday, 23 October 2026, 10:37

500 कोटींच्या आरोपांची तक्रार द्या; बावनकुळेंचे जरांगेंना आवाहन, पुरावे सादर केल्यास निष्पक्ष चौकशीचे आश्वासन

Friday, 23 October 2026, 10:35
Next Post

पत्नीच्या मृत्यूचा बनाव की प्रेमाचं जाळं? सुमितच्या सत्याने मानसीला हादरवलं; डोंबिवलीतील लॉजमध्ये तरुणीची भयंकर अवस्था..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp