Pune Prime News : काही दिवसांपूर्वी राज्यभरात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. संतप्त झालेल्या आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याला आग लावली होती. यानंतर आंदोलकांनी पुण्यासह बीड, आणि आसपासच्या परिसरातील राजकीय नेत्यांची घरं आणि रास्ता रोको तसेच जाळपोळीच्या घटनांना लक्ष केलं होत. या प्रकारानंतर राजकीय नेत्यांमध्ये एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करण्यात आले.
याच पार्शवभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करत म्हणाले, मराठा समाजाच्या आंदोलनातील हिंसेमागे शरद पवार यांचा हात आहे. असे वक्तव्य केलं होत. मात्र हे वक्तव्य आता गुणरत्न सदावर्ते याना महागात पडण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे समर्थक वेदप्रकाश आर्य यांनी सदावर्ते यांना नोटीस पाठवली आहे. सदावर्तेंच्या या आरोपांविरोधात शरद पवार गट आक्रमक झाल्याचं दिसत आहे. .
शरद पवार गटाचे समर्थक वेदप्रकाश आर्य यांच्याकडून गुणरत्न सदावर्ते यांना नोटीस पाठवत पुढील सात दिवसांच्या आत सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाऊन जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही कायदेशीर कारवाई करू, असा इशारा या नोटीसद्वारे देण्यात आला आहे. ते म्हणाले, ज्याप्रकारे तुम्ही शरद पवार यांच्यावर आरोप केला.
त्याप्रमाणे तुम्ही सर्व वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांसमोर जाऊन थेट स्पष्टीकरण द्यायला हवं की, मी जे काही आरोप केले आहेत, ते आधारहीन आणि चुकीचे आहेत. अन्यथा आम्हाला न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० अन्वये खटला दाखल करावा लागेल. असे शरद पवार गटाचे समर्थक वेदप्रकाश आर्य म्हणाले.