Hartalika Teej :आज हरितालिकेचा व्रत असून देशातील बहुतांश भागात हरितालिकेच्या व्रताला अनन्य साधारण महत्व आहे. हरितालिकेतचं व्रत भगवान शंकर-माता पार्वतीला समर्पित असून या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते. हरितालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करत असतात. हे व्रत करताना असताना महिला शंकर आणि पार्वतीच्या मूर्तीची विधिवत पूजा करतात आणि उपवास धरत असतात. यावर्षी हरितालिकेचा शुभ मुहूर्त नेमका कधी आहे ते माहिती करून घेऊ..
हरितालिका पूजा-विधी
हरितालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. या दिवशी गणपती आणि शंकर-पार्वतीची पूजा करावी. जर शक्य असेल तर सत्यनारायण पूजेच्या वेळी बांधतो तसे केळीचे खांब बांधून चौरंग फुलांनी सजवा. व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्र आणि विविध अलंकार घालून मग पूजेला सुरुवात करावी.
पूजा..
चौरंगावर रंगीत वस्त्र घाला, त्यावर कलश ठेवून बाजूला तांदूळ पसरवा. त्यावर पार्वतीची छोटी मातीची मूर्ती आणि शिवलिंग ठेवा. गणपती बाप्पांचा फोटो ठेवून बाप्पाची पूजा देखील करावी. उपलब्ध फळं, फुलं अर्पण करून यावेळी शिव पार्वती मानून एका दांपत्याची देखील पूजा करावी. आपल्या जमेल तस त्यांना अन्न, वस्त्र, दक्षिणा द्यावी. स्त्रियांना हळदकुंकू आणि वान दान करावे.
पूजेसाठी लागणारे साहित्य..
हरितालिकेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे..: शमी पत्र, वाळू, बेलपत्र, आंब्याची पानं, वस्त्र, पांढरी फुलं, सौभाग्याचं साहित्य, काजळ, कुंकू, चौरंग, दूध, मध, तूप, तेल, चंदन, शंख, पाण्याचा कलश, घंटा, रांगोळी, निरांजन, विड्याची पाने, तेलाच्या वाती, खडीसाखर,फळं, गूळ, खोबरं, समई, पंचामृत, उदबत्ती, कापूर, पळी, अक्षता, पंचपात्र,कोरे वस्त्र, हळद, कुंकू, ताम्हण तसेच फणी आणि आरसा यांसारखं साहित्य लागणार आहे.
हरितालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता?
पंचांगानुसार, 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:22 वाजता तृतीया तिथी सुरू होईल आणि 6 सप्टेंबर रोजी म्हणजेच (आज) पहाटे 03:01 वाजता समाप्त होईल. 6 सप्टेंबर रोजी उदया तिथी असल्याने या दिवशी उपवास केला जाईल. तर पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 06.01 ते 08.32 पर्यंत असणारा आहे.