पुणे : आयुष्मान भारत योजनेसंदर्भात एक मोठी बातमी आहे. तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळते. या योजनेत जर कोणी आजारी पडले तर त्यांना विमा मिळतो. तसेच या योजनेत आता विम्याचे पैसे वाढवण्याची मागणी केली जात आहे.
केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने आयुष्मान भारत योजनेतंर्गत विम्याची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. महिलांसाठी विम्याची रक्कम 10 लाखांहून 15 लाख करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत खाटांची संख्या वाढवण्याचीही मागणी केली जात आहे.
सध्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत सुमारे 7.22 लाख खाजगी रुग्णालयात बेड आहेत, ज्यात 2026-27 पर्यंत 9.32 लाख आणि 2028-29 पर्यंत 11.12 लाखांपर्यंत वाढ होण्याची मंत्रालयाला आशा आहे.
आयुष्मान भारत योजनेअतंर्गत लाभार्थ्यांची संख्या 55 कोटींहून 100 कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपये वार्षिक विमा संरक्षण दिले जाते. आतापर्यंत 55 कोटी लोकांनी या योजनेअंतर्गत अर्ज केले आहेत. या योजनेत विम्याची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.