Good News मुंबई : सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 171.50 रुपयांची कपात केली आहे. मात्र घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींमध्ये सध्या कोणताही बदल झालेला नाही. 1 एप्रिल रोजी देखील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही कपात करण्यात आली होती. त्यानंतर गॅस सिलेंडर सुमारे 92 रुपयांनी स्वस्त झाला होता. तर मार्चमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 350 रुपयांहून अधिक वाढ झाली होती.
सिलेंडरच्या किमती 171.50 रुपयांनी कमी…!
तेल विपणन कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. कंपन्यांनी 1 मे म्हणजेच आजपासून 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 171.50 रुपयांनी कमी केल्या आहेत.
1 मे 2022 रोजी दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 2355.50 रुपयांना उपलब्ध होता. आज त्याची किंमत 1856.50 रुपयांपर्यंत खाली आली आहे. म्हणजेच गेल्या वर्षभरात व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 499 रुपयांनी स्वस्त झाला आहे.