बंगळूर : अल्पवयीन प्रेयसी सोबत लग्न करण्यासाठी प्रियकराने तिची १८ वर्ष पूर्ण होण्याची वाट पहिली. तिची १८ वर्षे पूर्ण होताच दोघांनी पळून जाऊन लग्न केले. मात्र, लग्न करण्यासाठी मुलाला देखील वयाची अट असते, हीच अट विसरल्याने, प्रियकराला तुरुंगवारी घडल्याची घटना बंगळूर येथून उघडकीस आली आहे.
प्रेयसी प्री – युनिव्हर्सिटी कोर्समध्ये नापास झाल्याने महाविद्यालयीन शिक्षण सोडले. त्यामुळे प्रियकराने देखील महाविद्यालयीन शिक्षणाला रामराम ठोकून कॅब चालकाची नोकरी धरली. दोघेही अनेक वर्षांपासून संपर्कात होते. दोघांना लग्न करायचे होते. मात्र प्रेयसी अल्पवयीन असल्याने त्यांनी तिच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला.
या सगळ्या गडबडीत प्रियकर मात्र, लग्नासाठी मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण लागते हेच विसरला. प्रेयसीला १८ वर्षे पूर्ण होताच प्रियकराने प्रेयसीशी लग्न केले, तेव्हा प्रियकर केवळ २० वर्षे ३ महिन्यांचाच होता. प्रेयसीची मोठी बहीण व प्रियकराच्या चार मित्रानी त्यांचे लग्न लावून दिले. त्यानंतर ते तामिळनाडू मध्ये निघून गेले आणि तेथेच राहू लागले.
लग्न झाल्यानंतर हे दोघे तामिळनाडूला निघून गेले. त्यानंतर बेंगळूर पोलिसांत आईने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करत प्रियकरावर संशय व्यक्त केला. आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या दोघाचा शोध सूर केला आणि ही घटना समोर आली.
आता सरकारी वकिलांनी हे लग्न अवैध असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रियकराला तुरुंगवारी घडली आहे