Farmer News : पुणे : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी (various demands) नाशिक ते मुंबई असा निघालेल्या शेतकरी (farmers) लाँगमार्चला यश (successful) आले आहे. शेतकऱ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या शिंदे फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis government.) मान्य केल्या आहेत. ही माहिती आमदार विनोद निकोले (MLA Vinod Nikolay) यांनी दिली आहे. मागण्या मान्य झाल्याने शेतकऱ्यांच्या आंदेलनाचे (farmers’ movement) मोठ यश मानले जात आहे.
लाँग मार्च बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळाची भेट घेतली. या भेटीनंतर शेतकऱ्यांशी त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असल्याचे या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. तसेच विधानसभेत उद्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळामध्ये झालेल्या चर्चेचे निवेदन मुख्यमंत्री शिंदे मांडणार आहेत. तसेच लाँग मार्च मागे घेण्याचेही आवाहन शेतकऱ्यांना केल्याचेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले आहे.
दरम्यान, सरकार सोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र मोर्चा लगेच मागे घेणार नाही. मोर्चा आहे तिथेच थांबवला जाईल. अशी माहिती शेतकरी नेत्यांनी प्रसार माध्यमांना दिली. उद्या विधिमंडळाच्या पटलावर मागण्याचे विषय घेऊन संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणीचे आदेश पारित झाल्यानंतर मोर्चाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मोर्चा आज मागे घेणार नाही, मात्र उद्या आदेश निर्गमित झाल्यानंतर मोर्चा मागे घेणार असल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली आहे.
राज्यातील प्रत्येक तालुक्यात आता बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती