भिवापूर (आळेसूर): भिवापूर तालुक्यातील आळेसूर गावातील एका कुटुंबाने त्यांच्या विधवा सुनेचे लग्न करून एक हृदयस्पर्शी उदाहरण ठेवले समाजासमोर ठवले आहे. सुभाष ढोके आणि त्यांची पत्नी मंदा ढोके यांनी त्यांच्या मुलाच्या निधनानंतर त्यांची सून शितल नारनवरे हिचा पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला. शितलचे लग्न दोन वर्षांपूर्वी मुलगा शुभम ढोके याच्याशी विवाह झाले होते. तथापि, शुभमच्या अकाली निधनामुळे शितल विधवा झाली. मुलगा गेल्याचे दुःख असूनही, या जोडप्याने शितलला स्वतःच्या मुलीसारखे वागवले आणि तिच्या सुखासाठी तिचे पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला.
शितलच्या पालकांची संमती घेतल्यानंतर, या जोडप्याने तिचे लग्न सायगाव गावातील रोहित सवसाकडेशी लावले. हा विवाह गुरुदेव पद्धतीने करून देण्यात आला होता आणि शितलने तिच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाला सुरुवात केली. सुभाष ढोके आणि मंदा ढोके यांच्या निःस्वार्थ कृतीचे समाजात मोठ्या प्रमाणात कौतुक झाले आहे. त्यांच्या सुनेवरील प्रेम आणि करुणेने इतरांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. या जोडप्याच्या निर्णयाने हे दाखवून दिले आहे की खरे प्रेम आणि काळजी सर्व अडथळ्यांवर मात करू शकते. या जोडप्याच्या कृतीने अनेक जण प्रेरित झाले आहे.