पुणे : शिर्डीच्या साईबाबा मंदिर ट्रस्टला ५० हजार डॉलर्स (सुमारे ४२ लाख रुपयांहून अधिक) दान अमेरिकेत राहणाऱ्या अनिवासी भारतीय डॉक्टरने केले आहेत. त्यांची इच्छा पूर्ण झाल्याने त्याने हे दान केले आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची साईबाबांवर नितांत श्रद्धा असून साई-बाबांनी आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण दूर केली, अशी त्यांची श्रद्धा आहे.
अखिल शर्मा असे दान केलेल्या डॉक्टराचे नाव आहे.
‘दान ही छोटी गोष्ट आहे. आमच्याकडून जेवढे शक्य होते तेवढे आम्ही केले आहे. गरजूंना मदत करण्याची आमची इच्छा आहे. म्हणूनच मी बाबांचे आभार मानायला आलो आहे. बाबांनी नेहमीच प्रत्येक अडचणी दूर केल्या आहेत’ असे डॉ. अखिल शर्मा यांनी सांगितले.
डॉ. अखिल यांच्या पत्नी अपर्णा शर्मा म्हणाल्या की, मी व्यवसायाने डॉक्टर आहे, माझे पतीही बालरोगतज्ज्ञ आहेत. म्हणूनच आम्ही वैद्यकीय निधीसाठी देणगी दिली आहे. ज्या रुग्णांकडे उपचारासाठी पैसे नाहीत त्यांना मदत करावी, असे त्या म्हणाल्या. साईबाबांची कृपा त्यांच्यावर सदैव राहिली आहे. आम्ही सर्व पंजाबचे आहोत. आम्ही नुकतेच अमेरिकेहून आलो आहोत.