Kerala High Court : आपली मुलगी मोठ्या घराण्यात जावं, तिला चांगला नवरा मिळावा अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यासाठी मुलांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या मान्य करून मुलीचं लग्न लावून दिलं जातं. तसेच जावयाला देवाच्या स्थानी मानून त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली जाते.(son-in-law)
अनेकदा असंही झालं आहे. की, जावई आणि सासरच्या मंडळींकडून पैशासाठी मुलीचा छळ केला जातो, त्यातून मग आत्महत्येच्या किंवा हुंडाबळीच्या घटनाही सतत घडत असतात. एखाद्या कुटुंबात एक किंवा अनेक मुलीच असतील तर सासरच्या संपत्तीवर आपलाच हक्क असल्याचं जावई गृहीत धरतात. असच एक प्रकरण केरळ उच्च न्यालयात गेलं होत. त्या निकालावर न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. (Kerala High Court)
दरम्यान, जावयाचा आपल्या सासऱ्याच्या संपत्तीवर किंवा मालवत्तेवर खरच अधिकार असतो का ? आणि हो, तर जावयाला सासऱ्याच्या संपत्तीत किती अधिकार मिळू शकतो याबाबत उच्च न्यायालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमकं काय होत प्रकरण?
केरळ येथील हेंड्री थॉमस या इसमाने आपल्या जावया विरोधात म्हणजे डेव्हिसं राफेल यांच्या विरोधात त्याच्या मालमत्तेवर आणि घराच्या शांततापूर्ण व्यवसाय आणि उपभोगात हस्तक्षेप करण्यापासून कायमस्वरूपी बंदी घालण्याबाबत ट्रायल कोर्टासमोर दावा दाखल केला होता.
दरम्यान, सेंट पॉल चर्च, थ्रीचंबरम यांच्या वतीने फादर जेम्स नाझरेथ यांनी ही मालमत्ता भेटवस्तू म्हणून हेन्ड्रिला दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी या जागेवर स्वतःच्या पैशाने घर बांधलं आहे. आता हेंड्रि आपल्या कुटुंबासह या घरात राहत आहेत. यामुळे हेन्ड्रिने आपल्या जावयाचा त्यांच्या मालमत्तेवर कसलाच अधिकार नसल्याचा युक्तिवाद कोर्टात केला आहे. (father-in-law property)
जावयाने यावर बोलतांना म्हटलं आहे की, सदर मालमत्ता ही चर्चच्या अधिकाऱ्यांकडून कुटुंबाला भेट देण्यात आली होती. आता मी हेन्ड्रिच्या मुलीशी विवाह केला आणि विवाह केल्यावर मी व्यावहारिकदृष्ट्या कौटुंबिक सदस्य म्हणून स्वीकारलो गेलो आहे. त्यामुळे मला घरात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. असा दावा जावयाने कोर्टात केला होता. मात्र जावयाचा हा युक्तिवाद कोर्टाने धुडकावून लावला होता. लोअर कोर्टाने या प्रकरणावर निकाल देत जावयाला सासऱ्याच्या प्रॉपर्टी मध्ये कोणताही अधिकार नसल्याचे स्पष्ट केलं.
केरळ उच्च न्यायालयाच म्हणणं काय?
त्यानंतर जावायाने केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान, जावाई डेव्हिस राफेल याने आपले सासरे हेन्ड्री थॉमस यांच्या मालमत्तेवरील दावा फेटाळण्याच्या पाय्यान्नूर उपन्यायालयाच्या आदेशाविरुद्ध याचिका दाखल केली होती. याबाबत केरळ उच्च न्यायालयात न्यायमूर्ती एन अनिल कुमार यांनी यावर सुनावणी घेतली होती.
या सुनावनीत जावई आपल्या सासरच्या मालमत्ता आणि इमारतीवर कोणताही कायदेशीर हक्क बजावू शकत नाही असा निकाल न्यायमूर्ती एन अनिल कुमार यांनी देत सदर याचिका फेटाळून लावली. याचाच अर्थ जावयाचा आपल्या सासऱ्याच्या संपत्तीवर अथवा मालमत्तेवर कोणताही अधिकार नसून जावाई हा सासऱ्याच्या कुटुंबाचा भाग होत नाही.