Pune Prime News : मी अमित शहा यांचे विधान वाचले आहे. काही सभेत त्यांनी जाहीर केले की, मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आल्यास जनतेला रामलल्लाचे दर्शन मोफत दिले जाईल. संपूर्ण देश आणि जगामध्ये प्रभू राम प्रसिद्ध आहेत. पण निवडणूक प्रचारात ज्या प्रकारे राम लल्लाचा प्रचार केला जात आहे, त्याचा अर्थ असा होतो की, मध्य प्रदेशातील जनतेने तुमचा पराभव केला तर लोकांना राम लल्लाच्या दर्शनाला जाण्यापासून रोखले जाईल, हे कसले राजकारण? असा सवाल शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांनी एका प्रचारसभेत केला आहे.
पाच राज्यांमधील निवडणूक प्रचारात भगवान राम आणि राम मंदिराचा वापर केल्याबद्दल भारतीय जनता पक्षावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. टीका केली. भाजपच्या निवडणूक प्रचारात राम मंदिर केंद्रस्थानी आले आहे. प्रचारात ज्याप्रकारे मुद्दे उपस्थित केले जात आहेत, त्याबद्दल भाजपने माफी मागावी. असेही संजय राऊत म्हणाले. तुम्ही रामलल्लाचे मालक झालात का, रामलल्लाने तुम्हाला एजंट म्हणून नियुक्त केले आहे? ही अत्यंत गंभीर बाब असून निवडणूक आयोग खरोखरच जिवंत असेल तर यावर कारवाई झाली पाहिजे. असं राऊत म्हणाले.
तर आयोध्येत रामलल्लाचं मोफत दर्शन?
गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारसभेत सांगितलं होत की, आम्हाला मतं दिली आणि भाजपचं सरकार आलं तर आयोध्येत रामलल्लाचं दर्शन मोफत दिलं जाईल. अमित शहांच्या याच वक्तव्याने संजय राऊतांनी त्यांच्यावर आगपाखड केली आहे.
अमित शहांनी शब्द मागे घ्यावे
राम मंदिराचा सातबारा भाजपच्या नावावर केलेला नाही. म्हणून हे सर्व शब्द अमित शहांनी मागे घेतले पाहिजेत. आम्हाला मत दिलं तर मोफत दर्शन. नाही तर आम्ही ठरवणार दर्शन द्यायचं की नाही. म्हणजे भाजपला मत दिलं नाही तर त्या व्यक्तीला आयोध्येतून प्रवेश नाही, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थीत केला.