Devendra Fadnavis News : नागपूर : परवा देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं. काल आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असतानापालखी सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे. मंदिर व्यवस्थापनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका. आपल्यासाठी वारकऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची आहे.असे फडणवीस म्हणाले. (Worker safety is important; Do not politicize the event that did not happen! : Devendra Fadnavis)
सर्वानुमते निर्णय घेण्यात आला होता
देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. (Devendra Fadnavis News) त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त ढगे पाटील आणि सर्व मानाच्या दिंडीचे प्रमुख यांची एक बैठक झाली आणि गेल्यावर्षीसारखी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की प्रत्येक मानाच्या दिंडीला 75 पासेस देण्यात याव्यात. त्यानुसार संपूर्ण नियोजन करण्यात आले.
पुढे फडणवीस म्हणाले, काही स्थानिक तरुणांनी मध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडी झटापट झाली. आता परिस्थिती संपूर्णपणे शांत असून पोलिस स्थानिकांशी चर्चा करीत आहेत. (Devendra Fadnavis News) आम्ही सुद्धा गांभीर्याने याची दखल घेतली आहे. काही माध्यमांनी याचे वृत्तांकन करताना फार मोठा लाठीमार अशा बातम्या दिल्या, माझी माध्यमांना विनंती आहे की जे झाले नाही, त्यातून जनतेत क्षोभ निर्माण होईल, असे काही करू नका. गेल्यावर्षी चेंगराचेंगरी झाली, त्या घटनेचे आम्ही राजकारण केले नाही, माझे राजकीय पक्षांना सुद्धा आवाहन आहे की त्यांनी वस्तुस्थिती समजावून घ्यावी. वारकऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे. अशाही स्थितीत त्यांना राजकारण करायचे असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी लागेल. असे फडणवीस म्हणाले.
काय आहे प्रकरण
पालखी प्रस्थानावेळी मुख्य मंदिरात गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांनाच आत घेण्याचं देवस्थाने ठरवलं आहे. (Devendra Fadnavis News) तशी विनंती दिंडी मालकांना, फडकऱ्यांना आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई यांनी केली आहे. असं असताना काही वारकरी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे.
वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला हा अतिशय संतापजनक प्रकार : सुप्रिया सुळे
‘जे आजवर कधीही घडले नाही ते यावर्षी घडले. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यापुर्वी कधीही वारकऱ्यांवर बळाचा वापर केल्याची घटना घडली नव्हती. (Devendra Fadnavis News) आपल्या साध्या आणि सोप्या शिकवणूकीतून वारकऱ्यांनी देशाला वेळोवेळी दिशा दाखविली आहे. माऊलींच्या दिंडीसोहळ्याला प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे गालबोट लागले. दिंडीसोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.’
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : राज्यातील अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माणशास्त्र ‘एमएचटी-सीईटी’चा आज निकाल
Pune News : पुण्यात जिजामाता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा भरला मेळावा