पुणे : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत दिसत आहेत. काल बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली.
देवेंद्र फडणीस यांनी पदातून मुक्तता करण्याची मागणी करतानाच पक्ष संघटनेसाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्या निर्णयाला राज्यातील नेत्यांनी विरोध करत पराभवाची सामूहिक जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.
यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर मुक्कामी जात आहेत. मात्र त्यापूर्वीच आज सकाळी अमित शाह यांनी स्वत: फडणवीस यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. फडणवीस यांच्या मनात नेमकं काय चालंलय ते ऐकून घेतले आणि त्यांच्या भावना शाह यांनी जाणून घेतल्या.
आजच्या या मुक्कामी दिल्लीतील कोणत्या नेत्यांच्या भेटीगाठी करतात आणि काय निर्णय होते याकडे सुद्धा सगळ्यांचे लक्ष असणार आहे.