मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईने सर्वसामान्य नागरिकांना भेट दिली असून व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत तब्बल २५ रुपयांनी वाढल्या आहे.
मागील वर्षात (सन २०२२) मध्ये सुमारे पाच वेळा व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. दर महिन्याच्या १ तारखेला गॅस कंपन्या सिलेंडरचे दर जाहीर करतात. त्यानुसार गॅसच्या किमती कमी जास्त होत असतात.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत शेवटचा बदल जुलै महिन्यात करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आले नाहीत.
मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडर १७२१, दिल्लीत १७६९ कोलकात्यामध्ये १८७० तर चेन्नईमध्ये १९१७ रुपयांना उपलब्ध होणार आहे. घरगुती सिलेंडर मुंबईमध्ये १०५२.५, दिल्लीमध्ये १०५३, कोलकात्यामध्ये १०७९ तर चेन्नईमध्ये १०६८.५ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.