सुरेश घाडगे : परंडा
Fort News परंडा, (धाराशिव) : परंडा भुईकोट किल्ला (Paranda Bhuikot fort) स्वच्छता मोहिमेची (cleanliness campaign ) पहाणी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे (Dr. Collector of Dharashiv) यांनी सोमवारी (ता. ०८) केली आहे. स्वच्छता मोहिम शुक्रवारी (ता. ०५) सुरु झाली असून आज मोहिमेचा चौथा (fourth day of the campaign) दिवस आहे. (Fort News)
राज्याचे आरोग्य कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगर, शिवसेना, विकासरत्न प्रा. डॉ. तानाजीराव सावंत प्रतिष्ठाण आदिचे पदाधिकरी स्वयंसेवक तसेच गडप्रेमी, शिवप्रेमी करीत आहेत. या मोहिमेची सांगता मंगळवारी (ता .०९) होणार असून डॉ. सावंत हे शेवटच्या दिवशी या मोहिमेत सहभागी होणार आहेत.
दरम्यान, सोनारी येथील भैरवनाथ शुगरचे कार्यकरी संचालक तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांना चार दिवस केलेल्या श्रमदानातून या स्वच्छतेची माहिती पहाणी करताना दिली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी यात सहभागी असलेल्या श्रमदान केलेल्या स्वयंसेवक गडकिल्ले प्रेमींचे व स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :-
Sinhagad Fort | प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सिंहगड परिसर संवर्धनासाठी ३ कोटी ७५ लाख मंजूर
Paranda News : गड संवर्धन उपक्रमांतर्गत परंडा भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता मोहिम सुरु