Today Petrol Diesel Price : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती घसरत असताना भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी केले जातात. २०१७ पूर्वी दर पंधरा दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जात होते.
पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या ताज्या दरानुसार आज देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल ७७.३८ डॉलरवर व्यवहार करत आहे. सध्या WTI कच्चे तेल प्रति बॅरल $७२.९८ या दराने विकले जात आहे. त्याचा परिणाम देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर झाला आहे. देशातील पेट्रोल डिझेलच्या दरात किंचित बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर
मुंबई
- पेट्रोल – 106.31 रुपये
- डिझेल 89.62 रुपये
पुणे
- पेट्रोल 105.95 रुपये
- डिझेल 92.47 रुपये
ठाणे
- पेट्रोल 105.82 रुपये
- डिझेल 92.32 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर
- पेट्रोल 93.28 रुपये
- डिझेल 93.28 रुपये
नाशिक
- पेट्रोल 106.25 रुपये
- डिझेल 92.76 रुपये
नागपूर
- पेट्रोल 106.14 रुपये
- डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर
छत्रपती संभाजी नगर
- पेट्रोल 106.75 रुपये
- डिझेल 93.24 रुपये
SMS द्वारे दर जाणून घ्या आजचे दर
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर तुम्ही SMS द्वारे देखील मिळवू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> 9224992249 वर पाठवू शकतात किंवा HPCL ग्राहक 9222201122 किंवा नंबरवर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 वर किंवा नंबरवर पाठवू शकतात. अशाप्रकारे तुम्हाला घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर समजतील.