Pune : चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच एक विधान केले आहे. त्यावरून विविध तर्क लावले जात आहेत. “मोहनजी भागवत हे काय बोलले मला माहित नाही. ते आमचे पालक आहेत. पालकत्वाच्या नात्याने त्यांनी काही सांगितलं असेल, तर आम्ही त्याचा विचार करू” असं भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. दरम्यान विनोद तावडेंबद्दलही चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केल आहे. “विनोद तावडे हे पक्षाच्या सरचिटणीस पदापासून काम करत आहेत. त्यांच्यावर जी जबाबदारी आजपर्यंत दिली, ती त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्यामुळे त्यांना पक्षात आता मोठी संधी दिली जाऊ शकते. ती संधी सुद्धा ते यशस्वीपणे पार पाडतील” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
कंजद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे ती जबाबदारी कोणती असेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परंतु याबाबत चंद्रकांत पाटील जास्त बोलले नाहीत. मागच्या काही दिवस झालेत महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे येऊन ठाकलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणात वापसीच्या चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी उध्दव ठाकरेंच सुद्धा कौतुक केलं. “तब्येत बरी नसतानाही या निवडणुकीत सर्वाधिक कष्ट उद्धव ठाकरे यांनी घेतले आहेत” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं.पुढे ते असही म्हणाले की, “युती तोडून उद्धव ठाकरेंनी काय मिळवलं? 18 जागांवरून नऊ जागा आल्या. तसेच अल्पसंख्याकांच्या जीवावर निवडून आले हा ठपका पडला आणि पक्षाची वाताहत झाली ते वेगळच. उद्धव ठाकरेंसोबत असणारे एक वरून तेरा वर गेले. पवार यांनीही आपला फायदा करून घेतला” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत काय म्हणाले?
भाजपमध्ये अशी रीत आहे कि एकावेळी अनेक जबाबदाऱ्या शक्यतो दिल्या जात नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष बदलण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. “येत्या काळात तीन मोठ्या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जे पी नड्डा यांच्यावर पुढच्या तीन महिन्यांसाठी जबाबदारी कायम ठेवली जाऊ शकते. हा निर्णय सर्वस्वी वरिष्ठांचा आहे” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.