मुंबई : राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल केलेल्या एका वक्तव्यावर संजय राऊत यांच्यावर मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ?
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजना बंद झाली आहे, तर महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. याच विधानावर भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतला आहे. भाजप जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौधरी यांच्या तक्रारीवरुन राऊन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 353(2), 356(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, मध्यप्रदेशात सरकारतर्फे लाभार्थी महिलांना दर महिना 1250 रुपयांचा निधी देण्यात येतो. भाजप सरकार भगिनींच्या सक्षमीकरणासाठी काम करत आहे. त्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी भाजप सरकार महिलांच्या हितासाठी सातत्याने काम करत आहे. मध्यप्रदेशात गेल्या दोन वर्षांपासून लाडकी बहीण योजना सुरू आहे.