Buldhana News : बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. मलकापूर-बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये दहा ते १५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस राजूर घाटात उलटली आहे. या बसमधून एकूण ५५ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे. (Buldhana News) प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांकडून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे. बस ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला आहे. (Buldhana News) सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही.
बातमी अपडेट होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Buldhana News : मित्रासोबत राजूर घाटात फिरण्यासाठी आलेल्या महिलेवर ८ जणांकडून सामूहिक अत्याचार...
Buldhana News : शिक्षण क्षेत्रात खळबळ! एक लाखाची लाच घेताना लिपिक एसीबीच्या जाळ्यात