Breaking News : मुंबई : महारेराकडे जानेवारी महिन्यात नोंदवल्या गेलेल्या ७४६ प्रकल्पांनी २० एप्रिलपर्यंत स्थावर संपदा अधिनियमानुसार माहितीचा तपशील संकेतस्थळावर अद्ययावत करणे अत्यावश्यक होते. मात्र, याची वेळीच पूर्तता न झाल्याने विकासकांना प्रथम १५ दिवसांची आणि नंतर गंभीर स्वरूपाची ४५ दिवसांची नोटीस महारेराने बजावलेली होती. अखेर या नोटीसीलाही प्रतिसाद न देणाऱ्या सुमारे ३८८ विकासकांच्या प्रकल्पांची नोंदणी स्थगित करण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे.
प्रकल्पांची खातीही गोठवली
महारेराकडे नोंदवल्या गेलेल्या प्रकल्पांत पहिल्या ३ महिन्यांत किती सदनिका, गॅरेजची नोंदणी झाली, किती पैसे आले, किती खर्च झाले, इमारत आराखड्यात झालेला बदल (असल्यास) इत्यादी माहितीचा तपशील असलेले प्रपत्र १, २ आणि ३ संकेतस्थळावर अद्ययावत करणे गरजेचे असते. (Breaking News) मात्र, नोटीसीलाही दाद न देणाऱ्या बिल्डरना महारेराने दणका दिला आहे. परिणामी या प्रकल्पांची बँक खाती गोठविण्यात येत असून, त्यांना प्रकल्पाची जाहिरात, पणन, सदनिकांची विक्री करता येणार नाही. या प्रकल्पातील कुठल्याही विक्री व्यवहाराची व साठेखताची नोंदणी न करण्याचे निर्देश महारेराने संबंधित उप निबंधकांना दिले आहेत.
ग्राहकाला याबाबतची प्राथमिक माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी स्थावर संपदा अधिनियमात ही कायदेशीर तरतूद केली आहे. बिल्डरची उदासीनता म्हणजे ग्राहकांच्या हक्काचा भंग आहे, असे गृहीत धरून महारेराने ही कठोर कारवाई केली आहे. दरम्यान, कारवाई केलेल्या शेकडो विकासकांना याबाबतचे आदेश इ-मेलवर पाठविले असून, उर्वरित विकासकांनाही येत्या २ ते ३ दिवसांत हा निर्णय कळविण्यात येणार आहे. (Breaking News) जानेवारी २०२३ मध्ये नोंदवलेले हे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांनी २० एप्रिलपर्यंत तिमाही प्रपत्रे नोंदवणे, अद्ययावत करणे आवश्यक होते. सुरूवातीला तर फक्त ३ जणांनी ही माहिती अद्ययावत केली होती. नोटिस पाठविल्यानंतर ३५८ जणांनी प्रतिसाद दिला, तर ३८८ जणांनी दखल घेतली नाही.
स्थावर संपदा अधिनियमातील कलमांनुसार प्रत्येक विकासकाला तिमाही /वार्षिक असे कालबद्ध रीतीने विहित विवरण प्रपत्रे संकेतस्थळावर अद्ययावत करणे बंधनकारक आहे. (Breaking News) विकासकांना महारेराकडे त्यांच्या प्रकल्पाची नोंदणी करताना या बाबी स्पष्ट केल्या आहेत. असे असूनही तसेच पुरेशी संधी देऊनही ३५८ विकासकांनी आपापले तिमाही प्रपत्र संकेतस्थळावर अद्ययावत केलेले नाही. यामुळेच प्रकल्प स्थगितीची कारवाई करण्यात आलेली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking News : दिवे घाटात बांधकाम मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी ; १२ जण जखमी