Breaking News : गडचिरोली : जिल्ह्यातील प्रस्तावित खाणीवरुन नक्षलवाद्यांनी थेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना धमकी दिली आहे. धमकीनंतर गडचिरोली पोलीस विभाग सतर्क झाला आहे. आत्राम यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. त्यांना सध्या झेड सुरक्षा आहे, अशी माहिती नागपूर-गडचिरोली परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली. सुरजागडसह गडचिरोली जिल्ह्यात सहा नवीन खाणींना पाठिंबा दिल्यामुळे धर्मराव बाबा आत्राम हे नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आल्याची माहिती मिळत आहे.
आत्राम यांना झेड सुरक्षा पुरवणार
याबाबत बोलताना संदीप पाटील म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांना नक्षलवाद्यांचा विरोध आहे. नक्षलवादी जनतेमध्ये दहशत पसरवत आहेत.(Breaking News) बंदूकीच्या जोरावर लोकांना एकत्र करुन आंदोलन करत आहेत. तोडगट्टा गावाच्या नाक्यावरच नक्षलवाद्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या भागांमध्ये पोलीसांची वर्दळ वाढू नये यासाठी नक्षलवादी विकासकामांना विरोध करत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
स्थानिक आमदार आणि नवनियुक्त मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सर्वच कॉर्पोरेट घराण्यांना पाठींबा दिल्याबद्दल नक्षलवाद्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Breaking News) आत्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आदिवासींचे जंगल, जमीन उद्ध्वस्त केल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी पत्राद्वारे दिला आहे.
खाणींना पाठिंबा दिल्यामुळे आता मंत्री आत्राम थेट नक्षलवाद्यांच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे त्यांना झेड सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : मराठा आरक्षणाबाबत शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय; आता आरक्षणाचा मार्ग मोकळा!
Breaking News : अजित पवारांच्या बंडाचं नेमकं कारण आलं समोर; शरद पवार यांनाच फोडण्याचा…