Breaking News : मुंबई : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याची घटना गेल्या आठवड्यात (ता. १९ जुलै) घडली. या घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. अनेक संसार उद्धवस्त झाले. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे. मुंबईतील अंधेरी पूर्वमध्ये चार ते पाच फ्लॅटवर भलीमोठी दरड कोसळली. रहिवाशांनी वेळीच जीव मुठीत घेऊन बाहेर धाव घेतल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना अंधेरी पूर्वमधील चकाला परिसरातील रामबाग सोसायटीममध्ये घडली आहे.
रात्री पावणेदोनच्या सुमारास घडली घटना
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अंधेरी पूर्वमधील चकाला परिसरातील रामबाग सोसायटीमधील काही फ्लॅटवर रात्रीच्या वेळी अचानक डोंगराचा ढिगारा कोसळला. ही घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. घटना घडली तेव्हा नागरिक झोपेत होते. (Breaking News) मात्र, नागरिक वेळेत सावध होत तातडीने घराबाहेर पडल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या नरेंद्र नावाच्या रहिवाशाने या घटनेबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, “रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. खूप जोरात मोठा आवाज आला. आम्ही सात लोक घरात झोपलो होतो. मोठा आवाज ऐकून आम्ही घाबरलो. अचानक काय झालं? असा प्रश्न आम्हाला पडला.(Breaking News) कारण कधीच असा अनुभव आलेला नाही. आमच्या लाईनमध्ये सहा घरे आहेत. त्या सहाही घरांचे नुकसान झाले आहे. चार घरांचे जास्त नुकसान झाले आहे. २००७ मध्येही अशी घटना घडली होती. आम्ही बिल्डरला हे सांगितलं, भांडलो. त्याने मागच्या बाजूने काँक्रिटिकरण केले, पण ते व्यवस्थित केलेले नाही. औपचारिकता म्हणून त्याने ते केलेले आहे,” असा दावा त्यांनी केला.
पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाकाली रोडवर गुरु नानक शाळेजवळ ही सोसायटी आहे. सात मजली इमारत असून, रात्री अचानक टेकडीवरून माती आणि दगड यांचे भूस्खलन झाले. (Breaking News) या सोसायटीत १६८ खोल्या असून, संपूर्ण बिल्डिंग रिकामी करण्यात आली आहे.
दरम्यान, दरड दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिका अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या लोकांना सुरक्षित घराबाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking News : पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळली, दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर परिणाम