विशाल कदम
जिंती : सोलापूर रेल्वे विभागात आज शुक्रवार (ता.१७) पासून दौंड- सोलापूर नवीन डेमो सुरु झाली आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
करमाळा तालुक्यात तीन रेल्वे स्थानकांवर मिळाला थांबा…
दौंड-सोलापूर या लोहमार्गावर दैनंदिन प्रवास करणारा नोकरवर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच या मार्गावर लोकल ट्रेन एकच आहे. यामुळे या ट्रेनमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. अशा परिस्थितीत नागरिकांना गर्दीचा सामना करून प्रवास करावा लागत आहे.
त्यामुळे नागरिकांची कामे व्यवस्थित आणि वेळेवर होत नाहीत. त्यामुळे या मार्गावर नवीन गाडी सुरु करावी. अशी मागणी अनेक सामाजिक संघटना व प्रवासी वर्गाकडून करण्यात येत होती.
दरम्यान, सदर मागणीची दाखल घेऊन रेल्वे प्रशासनाने आजपासून सोलापूर-दौंड-सोलापूर अशी नवीन डेमो सुरु केली आहे. डेमो सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
डेमोचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे-
गाडी क्रमांक ०१४६१ सोलापूर ते दौंड डेमो-
1) सोलापूर- १०.०० (सकाळी)
2) मोहोळ- १०.२७
3) माढा- १०.५७
4) कुर्डूवाडी- ११.१८
5) केम- ११.३५
6) जेऊर- ११.५०
7) पारेवाडी- १२.१५ (दुपारी)
8) भिगवन- १२.३५
9) दौंड- १.०५.
गाडी क्रमांक ०१४६२ दौंड ते सोलापूर डेमो-
1) दौंड- ६.२५ (संध्याकाळी)
2) भिगवन- ६.४५
3) पारेवाडी- ७.०५
4) जेऊर- ७.२७
5) केम- ७.४०
6) कुर्डूवाडी- ७.५८ (रात्री)
7) माढा- ८.१५
8) मोहोळ- ८.४५
9) सोलापूर- ११.३५
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…