Breaking News : धाराशिव : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार गोवर्धनवाडी जवळ आज शनिवारी (ता.१०) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. भरधाव डम्पर अंगावर येताच खासदार निंबाळकर यांनी प्रसंगावधान राखत उडी मारली, त्यामुळे ते बचावले आहेत. मात्र, या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Dharashiv MP Omraj Nimbalkar narrowly escapes the accident, hit or miss? A discussion on this…)
प्रसंगावधान राखत उडी मारली, त्यामुळे बचावले
मिळालेल्या माहीतीनुसार, खासदार ओमराजे निंबाळकर हे नेहमीप्रमाणे सकाळी व्यायामासाठी बाहेर पडले होते. गोवर्धनवाडी जवळ मॉर्निंग वॉक करीत असताना, (Breaking News) भरधाव डम्पर त्यांच्या अंगावर आला. मात्र ओमराजे यांनी प्रसंगावधान राखत उडी मारली. त्यामुळे ते या अपघातातून थोडक्यात बचावले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी भरधाव डम्परचा पाठलाग करत चालकाला ताब्यात घेतले आहे. (Breaking News) पोलिसांनी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा प्रकार घडला आहे. असे डम्पर चालकाने पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. मात्र हि घटना चुकून घडली आहे. कि घातपात आहे. याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…