Breaking News | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे 40 आमदारांसमवेत भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चांगलीच रंगली आहे. अजित पवार जर सत्तेत आले तर शिवसेना (शिंदे गट ) काय नेमकी भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते. अखेर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू होत्या. भाजप सह शिवसेनेतील अनेक नेत्यांनी अजित पवार अस्वस्थ असल्याचे बोलून दाखवले होते. त्यामुळे अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
याबाबत शिरसाट म्हणाले की, ” विरोधी पक्ष नेते अजित पवार भाजपमध्ये किंवा शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत आहे, पण अजित पवारांचा राष्ट्रवादीचा गट सत्तेत सामिल झाला, तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल. असे मोठे वक्तव्य शिरसाट यांनी केल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
उध्दव ठाकरेंचे नेतृत्व मान्य नाही…
अजित पवार महाविकास आघाडीत नाराज आहेत. तसेच त्यांच्या पक्षातही आताच नाराज नाहीत. तर पूर्वी पासूनच नाराज आहेत. त्यांना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेने नेते उध्दव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य नाही. असे शिरसाट म्हणाले.
अजित पवार शिवसेनेत अथवा भाजपामध्ये आले तर त्यांचे स्वागतच करु असेही शिरसाट म्हणाले आहेत.