Breaking News अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची हत्या करण्याती धमकी देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
शेतीच्या वादातून संगनमताने कुटुंबावर अन्याय झाल्याचा आरोप…!
श्रीरामपूर येथील निपाणी वडगावच्या संतोष गायधने या व्यक्तीने ही धमकी दिली आहे. 1 मे रोजी राळेगण सिद्धी येथे जाऊन हत्या करणार असल्याचा इशारा त्याने दिला आहे. शेतीच्या वादातून संगनमताने कुटुंबावर अन्याय झाल्याचा आरोप त्यांने केला आहे. शेतीच्या वादातून गटातील 96 जणांनी कुटुंबावर दबाव आणला असून खोट्या केस दाखल करून भीती दाखवण्यात येत आहे, असे त्याचे म्हणणे आहे.
शेतीच्या वादामध्ये अण्णा हजार यांनी मध्यस्थी करून आपल्याला न्याय द्यावा यासाठी गायधने यांनी अण्णा हजारे यांना निवेदन दिले होते. गायधने यांनी अण्णा हजारे यांच्याकडे मदतीची मागणी केली होती, परंतु अण्णांनी माझ्या निवेदनाची दखल घेतली नाही असा आरोप करत, गायधने यांनी राळेगणसिद्ध येथे जाऊन अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याचे सांगितले आहे.
संतोष गायधने यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, शेतीच्या वादात आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. त्यामुळेच आम्ही अण्णांकडे गेलो. पण अण्णासुद्धा मॅनेज झाले. त्यामुळे मी राष्ट्रपती महोदयांकडे इच्छामरणाची याचिका दाखल केली आहे. आम्हाला न्याय देणं शक्य नसेल तर आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी याचिका मी दाखल केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : हे काय ! पुण्यात पाळीव श्वानाच्या विष्ठेवरून वाद; अंगावरील कपडे फाडून महिलेला मारहाण!
Pune Crime : चिकन सेंटर चालकाने २०० रुपये देतो अशी बतावणी करून अल्पवयीन मुलीवर केले ते चाळे !