Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिंदी सक्तीवरून वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शासननिर्णय रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 29 June 2025, 19:59

राज्यात हिंदी सक्तीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही शासननिर्णय रद्द करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली.

फडणवीस काय म्हणाले?

“आजच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाला चहापानासाठी निमंत्रित केले होते. मात्र, नेहमीप्रमाणे त्यांनी चहापानावर बहिष्कार टाकला. त्यांनी मोठे पत्र दिले असले तरी त्यातील मजकूर फारसा नव्हता. मागील पत्रातीलच मुद्दे मोठ्या अक्षरात पुन्हा मांडले गेले. फक्त एक-दोन नवीन मुद्दे जोडले गेले आहेत,” असे फडणवीस म्हणाले. तसेच, “मराठीचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, परंतु विरोधकांच्या पत्रात व्याकरणाच्या तब्बल २४ चुका आढळल्या. यावरून त्यांची गंभीरता लक्षात येते,” अशी टीकाही त्यांनी केली.

हिंदी सक्तीबाबत स्पष्टीकरण

हिंदी विषयाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “आम्ही कालच निर्णय घेतला की मराठी भाषा अनिवार्य असेल आणि हिंदी ऐच्छिक राहील. कोणतीही भारतीय भाषा पर्याय म्हणून निवडता येईल. कोणावरही हिंदी सक्ती केली जाणार नाही.” ते पुढे म्हणाले, “झोपलेल्याला उठवता येते, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही. अशी स्थिती विरोधकांची आहे.”

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पार्श्वभूमी

फडणवीस यांनी स्पष्ट केले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आधीच कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमध्ये लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्रात हे धोरण प्रथमच लागू होत नसून, त्याची प्रक्रिया तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सुरू झाली होती. दिनांक २१ सप्टेंबर २०२० रोजी या धोरणाची अंमलबजावणी कशी करावी यासाठी तज्ञ समिती नियुक्त करण्यात आली होती, आणि १६ ऑक्टोबर २०२० रोजी त्याबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला होता.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीच्या नावाखाली लूट! भरतीच्या आमिषाने 11 डॉक्टरांना लाखोंचा गंडा?

Saturday, 21 November 2026, 23:05

मांडवगण फराटा येथील महाविद्यालयाला 70 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला तब्बल चार महिन्यांनी अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Saturday, 21 November 2026, 22:22

“तर पदाचा राजीनामा देईन, जिवाचीही पर्वा करणार नाही!” नरहरी झिरवळांचा कुणाला शब्द? राजकीय वर्तुळात खळबळ!

Saturday, 21 November 2026, 22:07

बारामतीत गोळीबाराचा थरार!कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी उद्योजकाला बनवले गोळ्यांचे लक्ष्य,धडाधड गोळ्या

Saturday, 21 November 2026, 21:28

अंदमानमध्ये लोणी काळभोरच्या लेकींचा डंका! भरतनाट्यम स्पर्धेत लिशा कलाल, कायरा गोयल प्रथम

Saturday, 21 November 2026, 20:33

खराडीतील बेकायदा दारू विक्री करणाऱ्या तीन हॉटेलांवर पोलिसांचा छापा; 58 ग्राहकांसह हॉटेल मालक व वेटर पोलिसांच्या जाळ्यात!

Saturday, 21 November 2026, 20:27
Next Post

'आयपीएल स्टार' यश दयालवर लैंगिक छळाचा आरोप; लग्नाचे आमिष दाखवून...! नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp