Big News मुंबई : राज्यातील अनेक कारागृहांमध्ये हजारो कैदी सध्या शिक्षा भोगत आहेत. पण काही कैदी जामिनावर बाहेर आहेत. (Big News) मात्र, असे कितीतरी कैदी आहेत जे जातमुचलक्याची (Personal Bond) रक्कम नसल्याने तुरुंगातच खितपत पडले आहेत.(Big News) यातील शिक्षेच्या कालावधीच्या 25 टक्के मुदतीइतका कारावास भोगलेल्या कैद्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. (Big News) त्यानुसार, जे कैदी जामीन मिळण्यास पात्र आहेत. अशांना जामिनावर मुक्त केले जाणार आहे. (Big News)
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे येरवडा कारागृहात ‘न्यायदान हेच जीवनदान’ या उपक्रमाअंतर्गत कारागृहातून जामीन मिळण्यास पात्र असणाऱ्या कैद्यांना न्याय आणि विधी सेवा दिली जाणार आहे. ही सेवा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि मुख्य जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली दिली जाणार आहे.
न्याय आणि विधी सेवा मिळणं हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार
न्याय आणि विधी सेवा मिळणं हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. आज कारागृहात शिक्षा झालेले आणि कच्चे कैदी असे आहेत, ज्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्यासह वकील मिळण्याचाही हक्क आहे. मात्र, याबाबत कैदीच अनभिज्ञ आणि उदासीन असल्यामुळे वर्षानुवर्षे कैद्यांना कारागृहात राहावे लागते. कैद्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे आणि कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना न्याय मिळवून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश सोनल पाटील यांनी दिली.