Big News : मुंबई : राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बदली झाली की लगेच संबंधित ठिकाणी जावे लागते. पण बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ प्रभावाने न गेल्यास कारवाई होते. अशीच कारवाई महसूल विभागातील तब्बल 11 अधिकाऱ्यांवर झाली आहे. यामध्ये 4 उपजिल्हाधिकारी आणि 7 तहसीलदारांचा समावेश आहे. हे सर्व अधिकारी बदलीच्या ठिकाणी रुजू झालेच नाही. अखेर त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
वाचा नेमकं झालं तरी काय?
या अधिकाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी एप्रिलपासून अनेकदा कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आल्या होत्या. मात्र, या अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. (Big News) आपल्या आवडीप्रमाणेच पोस्टिंग मिळाली पाहिजे हा अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा नेहमीच आग्रह पाहायला मिळतो. यासाठी ते मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या माध्यमातून मनासारखी पोस्टिंग मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, महसूल विभागाने या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
कोणत्या अधिकाऱ्यांवर झाली कारवाई
यामध्ये चार उपजिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात अहमदनगर जिल्ह्यात बदली झालेले अभयसिंग मोहिते, यवतमाळ जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी इब्राहिम चौधरी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. इतर दोघांची अद्याप समजू शकली नाहीत. (Big News) तर तहसीलदारांमध्ये बालाजी सूर्यवंशी (अप्पर तहसीलदार, नागपूर), सुचित्रा पाटील (करमणूक शुल्क अधिकारी, नाशिक), पल्लवी तभाने (संजय गांधी योजना, वर्धा), सुनंदा भोसले (खरेदी अधिकारी, नागपूर) यांच्यासह इतर तीन तहसीलदारांचा समावेश आहे.
विभागीय आयुक्त पातळीवर चौकशी करा; महसूलमंत्र्यांचे आदेश
जे महसूल अधिकारी बदली होऊनही त्या ठिकाणी अद्यापही रुजू झाले नाहीत, अशा सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करत विभागीय आयुक्त पातळीवर चौकशी करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : मोशीतील गृहप्रकल्पामध्ये वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशींना अटक; एटीएसची मोठी कारवाई
Big News : मराठा आरक्षण नाही, तोपर्यंत मतदान नाही; अतीट ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय