Big News रत्नागिरी : पोलीस दलातून मोठी बातमी समोर आली आहे. बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. पोलिसांची व्हॅन पलटी होऊन हा अपघात झाला यामध्ये 17 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. रत्नागिरीतील कशेळी बांध येथे येथे हा अपघात झाला आहे.
जखमी पोलीसांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल..!
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बचाव कार्य करण्यात आले व जखमी पोलीसांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीसांच्या गाडीला हा अपघात झाला.
रत्नागिरीमध्ये बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण आजपासून (24 एप्रिल 2023) पुन्हा सुरू होणार आहे. राजापूर बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीसाठीच्या माती सर्वेक्षण करण्यात येत असून काही स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आजपासून ड्रिलिंग करून माती सर्वेक्षण सुरू होणार होते. त्यामुळे सर्व भागात कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यासोबतच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या कारणास्तव विविध भागांतून पोलीस बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले होते. राजापूर येथील बंदोबस्तासाठी पोलिसांची गाडी निघाली असता कशेळी बांध येथे पोलिसांची व्हॅन पलटी झाली. या अपघातात 17 पोलीस जखमी झाले असून जखमी पोलिसांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Accident : नवीन कात्रज बोगद्यात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू