परभणी : परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अकोली येथे पुलावरून ५० फूट खोल दरीत बस कोसळून भीषण अपघात झाला आहे. जिंतूरहून सोलापूरला जात असलेली ही बस नदीच्या पुलावरून खाली कोसळली. या अपघातात बसमधील १५ ते २० प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सर्व जखमींना तत्काळ जिंतुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जिंतुर-सोलापूर ही बस सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जिंतूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली पुलावरून जात असताना हा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने वळणावरून बस तब्बल ५० फूट खोल नदीपात्रात कोसळली. बस पलटी झाल्याने बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिक, पोलीस यंत्रणेने तत्काळ सर्व प्रवाशांना बाहेर काढून खासगी वाहनांतून उपचारासाठी ग्रामीण रुग्णलयात हलवले. त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
नदीवरून जात असतांना चालकाचा नियंत्रण सुटले आणि बस थेट नदीत ५० फूट खाली कोसळल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मदतीला धावून आले. बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना तत्काळ बाहेर काढून, त्यांना खासगी गाड्यांमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी देखील जखमींना मदत करत रुग्णालयात दाखल केले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बसमधील १५ ते २० प्रवासी जखमी झाले आहेत.