Big News : अंतरवाली सराटी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. सहा दिवस पोटात अन्न-पाणी न गेल्यामुळे जरांगे पाटील अशक्त झाले आहेत. आरक्षणाला समर्थनार्थ अनेक गावांमध्ये नेते, मंत्री, आमदारांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. काही आमदारांनी मराठा आरक्षणाला पाठींबा देत सरकारला धारेवर धरले आहे. आता जरांगे यांच्या कुटुंबियांनी काळजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. आपल्या वडिलांची अवस्था पाहून जरांगे पाटील यांची मुलगी भावूक झाली. अजित पवार आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी अंतरवलीत येणार होते; पण त्यांना डेंग्यू झाला आहे, बाकीच्या कार्यक्रमांना ते जातात; पण मराठा आरक्षणासाठी जायचे म्हटल्यावर लगेच आजारी पडतात, असे सडेतोड उत्तर मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीने दिले आहे.
कोणीही आत्महत्या करू नका,मनोज जरांगे-पाटील यांचे आवाहन
माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांची मुलगी म्हणाली की, माझ्या कुटुंबियांना उपोषणस्थळी आणू नका. कुटुंब आणल्यावर मला त्रास होतो. पार जिवाला लागतं माझ्या. (Big News) मी मरावं अशी इच्छा हाय का? तुम्ही बार बार कुटुंब आणून बसविता इथं, तसं करू नका, असं आमच्या पप्पांनी सांगितलं आहे. या अवस्थेला सरकारच जबाबदार आहे. पप्पांनी पाणी तरी घेतले पाहिजे. त्यांची अवस्था पाहून आईची परिस्थिती पण रडवेल्यासारखी झाली आहे. अजित पवार अंतरवलीत येणार होते पण त्यांना डेंग्यू झाला आहे. बाकीच्या कार्यक्रमांना ते जातात पण मराठा आरक्षणासाठी जायचे म्हटले की आजारी पडतात.
दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. परंतु, उपचार घेण्यास त्यांनी ठाम नकार दिला आहे. मला बोलता येते तोपर्यंत चर्चेला या, असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे. (Big News) महाराष्ट्रात जेथे साखळी उपोषण सुरू आहे, तेथे आमरण उपोषणाला सुरुवात करा. प्रत्येक पोलीस ठाण्यात परवानगीचा अर्ज द्या. कोणीही आत्महत्या करू नका, असे आवाहनही मनोज जरांगे-पाटील यांनी केले. मराठा बांधवांनी एकजूटीने रहावे, असेही जरांगे-पाटील यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : ITR भरणाऱ्यांच्या संख्येत 90 टक्क्यांची वाढ; 2021-22 मध्ये संख्या 6.37 कोटींवर
Big News : मराठा आरक्षणाला पाठिंब्यासाठी शिंदे गटाच्या खासदाराने दिला राजीनामा