Big News : पुणे : पुणे शहराच्या लोकसंख्येएवढीच वाहनांची संख्या आहे. परिणामी प्रदूषण आणि वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. वाहतूक कोंडीतून पुणेकरांची मुक्ती करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मेट्रोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरवात झाल्यानंतर पुणेकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. पीएमपीच्या ताफ्यात नव्या बस देखील आल्या आहेत. आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शहरात भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत एनसीएपी) सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. या संस्थेमधून देशभरातील कारचे कमांड आणि कंट्रोल होणार आहे. या संस्थेचे उद्घाटन नितीन गडकरी यांनीच केले आहे.
नवीन वाहनांना स्टार रेटिंग देण्याचे काम पुण्यातून होणार
या योजनेअंतर्गत भारत एनसीएपीमध्ये सर्व नवीन वाहनांना स्टार रेटींग देणार आहे. वाहनांमध्ये असलेल्या सुरक्षारचना तपासून भारत एनसीएपी कमांड आणि कंट्रोल सेंटरमधून स्टार रेटिंग देण्याचे काम करणार आहे. वाहनांमध्ये केलेल्या सुरक्षा उपाययोजनेच्या आधारवर रेटिंग देण्यात येणार आहे. (Big News) त्यामुळे गाड्यांना एक ते पाच स्टार रेटिंग दिले जाईल. त्यामुळे ग्राहकांना कोणत्या गाडीत कशी सुरक्षा आहे, हे समजणार आहे.
या माध्यमातून फ्रंटल इम्पॅक्ट, साइड इम्पॅक्ट आणि अपघातानंतर दरवाजे उघडण्याचा अभ्यास केला जाणार आहे. वाहनांमध्ये ठेवलेल्या डमीच्या साहाय्याने समोरासमोर होणाऱ्या टक्करच्या परिणामांचा अभ्यास केला जाणार आहे. इलेक्ट्रीक उपकरणावर रेटिंग दिले गेले आहे, (Big News) त्यामुळे त्यातील सुरक्षा आणि विजेची बचत समजते, तसेच रेटिंग आता कारला दिले जाणार आहे. भारत एनसीएपी ॲडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन, चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शन आणि सेफ्टी असिस्ट टेक्नोलॉजीज या प्रकाराची पॅरामीटर्स तपासल्यावर रेटिंग देण्यात येणार आहे. भारतात इतर देशांतील रस्त्यांच्या तुलनेत रस्ते वेगळे आहेत. त्यामुळे भारतात वापरण्यासाठी बनवल्या जाणार्या गाड्यांची चाचणी भारतीय मानकांनुसार व्हावी हा उद्देशाने केंद्र सरकारने भारत एनसीएपी सुरू केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : मराठवाड्याच्या विकासासाठी ४५ हजार कोटींचा निधी जाहीर; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Big News : मुंबई विमानतळावर विमान क्रॅश ; तीन जण जखमी; विमानांचे टेक ऑफ, लँडिंग बंद