Big News | छत्तीसगड : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले आहेत. दंतेवाडा येथील अरणपूर येथे जिल्हा राखीव रक्षक दल दलाच्या वाहनावर आयईडी हल्ला करण्यात आला. शहीद जवानांमध्ये 10 DRG सैनिक आणि एका ड्रायव्हरचा समावेश आहे. या संपूर्ण घटनेत जवानांचे मोठे नुकसान झाले आहे. तर नक्षलवादीही मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदाक चकमक देखील झाली. या घटनेनंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
#WATCH | Visuals from the spot in Dantewada where 10 DRG jawans and one civilian driver lost their lives in an IED attack by naxals. #Chhattisgarh pic.twitter.com/GD8JJIbEt2
— ANI (@ANI) April 26, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर पोलिसांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. दोघांमधील चकमक अजूनही सुरूच आहे. आणखी फोर्स मागवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याठीकाणी जवानांचा फौजफाटा रवाना करण्यात आला आहे. यासोबतच वैद्यकीय सुविधा देण्यासाठी दोन रुग्णवाहिकाही देखील रवाना करण्यात आल्या आहेत.
या हल्ल्या नंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नक्षलवाद्यांना सोडले जाणार नसल्याचे भाष्य केले आहे. ते म्हणाले शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो हा लढा शेवटच्या टप्प्यात असून नक्षलवाद्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवाद संपवू.