नवी दिल्ली : स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गांधीनगर कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे. आसाराम बापू हा २०१३ मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळले आहे.
आसाराम बापूवर उत्तर प्रदेशच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही मुलगी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे आसारामच्या आश्रमात शिकत होती. आसारामने तिला जोधपूरजवळच्या आश्रमात बोलावून तिच्यावर १५ ऑगस्टला २०१३ बलात्कार केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर २० ऑगस्ट २०१३ ला आसारामानी १५ ऑगस्ट रोजी एका मुलीचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार दिल्लीत दाखल करण्यात आली नंतर हा खटला जोधपूर कोर्टाकडे सोपण्यात आला.
दरम्यान, आसाराम बापू यांना गांधीनगर कोर्टाने मोठा दणका दिला असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.