पुणे : शेतकऱ्यांसाठी एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे. गोकुळ दूध संघटनेकडून गायीच्या दूध खरेदी दरामध्ये ३ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. गोकूळ गायीचे दूध यापूर्वी ३३ रुपयांनी खरेदी करत होते. त्यानंतर आता या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. शेतकऱ्यांकडून आत फक्त ३० रुपयांत दूध खरेदी केले जाणार आहे.
गोकुळ दूध संघटनेचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप धक्कादायक असा आहे. निवडणुक संपताच गोकुळकडून घेण्यात आलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी निराशा वाढवणारा आहे. गोकुळ दुधाला जास्त भाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना ३५ रुपये भाव दिला होता. ३० रुपये स्थायी भाव तर ५ रुपये अनुदान देण्यात आले होते. मात्र, आता या दरांमध्ये कपात करण्यात आली आहे.
गोकुळ दुधाच्या खरेदी दरात ३ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून ३० रुपयांनी गोकुळ दूध खरेदी केले जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दूधाचे दर ४० रुपये व्हावे, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. परंतु आता तर दूध खरेदीचे भाव ३० रुपये केल्याने शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसणार असल्याचे दिसत आहे.